Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्ञानोबा, तुकारामच्या गजरात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शिक्षण मंदिर संचलित अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा यांच्या वतीने विसनजीनगर परिसरात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

 

दिंडी सोहळ्यात विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात तयारी करून आले होते. ज्ञानोबा , तुकारामच्या गजरात परिसरात दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या मार्गात विद्यार्थ्यांनी पावली, फुगडी खेळत, रिंगण घालत उत्साहात दिंडीचा आनंद घेतला. परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळ्याची गायत्री मंदिर येथे सांगता झाली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक ललित नेमाडे सर, वैशाली राठोड, शारदा धांडे, योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, उमेश चौधरी, नीलिमा वारके, स्नेहल ठाकूर, ज्योती इंगळे, तसेच अध्यापिका विद्यालयाच्या अध्यापकाचार्य नीलिमा बेंडाळे, लीना महाजन, जागृती भोळे ,चेतन लोहार, दीपक पिंगळे व नरेंद्र चव्हाण सर आदि उपस्थित होते. तसेच अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अशा प्रकारे दिंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला.

Exit mobile version