Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्ञानगंगा विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

 

जामनेर : प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक  मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येथे आज सकाळी संस्थेच्या सचिव तथा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

 

यावेळी प्रमुख अतिथी पंडित दीनदयाल संस्थेचे सचिव के. बी. माळी ,  आय. एम. आर. कॉलेजचे किशोर पाटील, सचिव दिपक पाटील , सीनियर कॉलेजचे प्राचार्य शिंदे , ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. जे. सोनवणे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी. पी. काळे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्र संचलन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक  व्ही. एन. पाटील यांनी केले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले आणि नगरपरिषडेच्या आवाहनानुसार  हरित क्रांति दिनाची शपथ विद्यालयाचे प्राचार्य आर. जे. सोनवणे सर यांच्या नेतृत्वाखाली  घेण्यात आली.

 

Exit mobile version