Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

जामनेर, प्रतिनिधी । ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक,मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,शिवाजी नगर , जामनेर येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे सचिव के.बी.माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आय.एम.आर.कॉलेज चे सचिव दिपक पाटील यांच्यासह ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य,आर.जे. सोनवणे, एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास काळे , आय.एम. आर.कॉलेज चे प्राचार्य,किशोर पाटील आणि स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेजचे प्राचार्य,शिंदे उपस्थित होते.संचलन क्रीडाशिक्षक व्ही.एन.पाटील यांनी केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना संसर्गजन्य विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांनी तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेवून मानवंदना देत राष्ट्रगीत म्हणून समारोप करण्यात आला.

Exit mobile version