Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जो मै बोलता हू; ओ मैं डेफेनेट्ली करता हू – आ. मंगेश चव्हाण (व्हिडिओ)

चाळीसगाव, जीवन चव्हाण | शहरात गत दोन वर्षांपासून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. मात्र अनेक आंदोलने करूनही हि समस्या मार्गी न लागल्याने नागरिक हे त्रस्त होते. दरम्यान, आ. मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने खड्यांसह रस्त्यांची दुरुस्तीला सुरुवात केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

 

चाळीसगाव शहरात गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. शहरातील तहसील कार्यालय ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अनेकांना मनक्याचा आजार जडला आहे.  खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शहर विकास आघाडीकडून ढोल बजाव आंदोलनासह अनेक आंदोलने करण्यात आली. परंतु, या आंदोलनातून काहीच साध्य झाले नाही. याउलट रस्त्यांच्या समस्येला घेऊन चाळीसगाव शहरातील नागरिकांचा  आक्रोश दिवसागणिक वाढत असल्याचे पहायला मिळत होते.  मात्र, हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात घेऊन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी काही तासांतच खड्डे बुजवून रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात केल्याने याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. कुठेही या गोष्टीची वाच्यता न करता आमदार मंगेश चव्हाण यांनी एकाएकी सदर कामाला सुरुवात केल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संवाद साधण्यात आला असता अतिवृष्टीमुळे चाळीसगाव शहरासह तालुक्यात सहाव्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहेत. तसेच  मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. यामुळे यासंदर्भात मी सरकारशी वारंवार चर्चा केली. मात्र पाच रूपयांची मदतही पूरग्रस्तांना अद्याप मिळालेली नाही. म्हणून राज्य सरकारवर विसंबून न राहता राजकारणाच्या पलिकडे जाऊन एक नैतिक जबाबदारी म्हणून शहरातील मुख्य पाच रस्त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे  जो मै बोलता हू; ओ मैं डेफेनेट्ली करता हू असे सिनेस्टाईल संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी साधला.

 

 

Exit mobile version