जो माणूस बाळासाहेबांना झाला नाही तो मुंबईकरांचा काय होणार – जितेंद्र अव्हाड

नवी मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । जो बाळासाहेब आणि शरद पवारांचा झाला नाही, तो नवी मुंबईकरांचा काय होणार, अशी सनसनीत टीका त्यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे. वृक्षतोडीबद्दलचा ठराव आमच्या आधीचा आहे. नवी मुंबई स्वत:ची सलतनत मानणाऱ्या गणेश नाईक यांनी हा ठराव पास करून घेतला होता असेही त्यांनी सांगितले.

जितेंद्र अव्हाड म्हणाले की, वृक्षतोडीबद्दलचा ठराव आमच्या आधीचा आहे. नवी मुंबई स्वत:ची सलतनत मानणाऱ्या गणेश नाईक यांनी हा ठराव पास करून घेतला, आता का ओरडत आहात, असा सवाल गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना केला आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. उड्डाणपुलासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे वृक्षतोड या एकाच मुद्द्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा दोघांनीही आंदोलन केले. तसेच जो बाळासाहेब आणि शरद पवारांचा झाला नाही, तो नवी मुंबईकरांचा काय होणार, अशी सनसनीत टीका त्यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे.

आव्हाड म्हणाले, की ठराव २००८ चा आहे. नवी मुंबईत उड्डाणपूल बांधण्याचा ठराव येथील बादशहा समजणारे नाईक यांचा ठराव २००८चा आहे. आता आम्ही जाहीर केल्यानंतर का ओरडत आहात. पाप मनात खात असते. नवी मुंबईच्या सुजाण जनतेने सत्तेवर आणले ते काय वृक्ष कापायला? जेव्हा ठराव पास केला तेव्हा झाडे नाही दिसली का, असा सवाल करत सर्व नाटके असल्याचा टिका देखील केली.03:02 PM

Protected Content