Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जोशी कॉलनी परीसरात दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील नवीन जोशी कॉलनी परीसरात दाम्पत्याला शिवीगाळ व दगड मारून दुखापत करणाऱ्या गिरीष अशोक गायकवाड रा. नवीन जोशी कॉलनी याला सोमवार २४ जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ६ ऑक्टोबर २०१५ रोजी संशयित आरोपी गिरीष गायकवाड याचा पाळीव कुत्रा हा सुरेश मधुकर गायकवाड रा. नवीन जोशी कॉलनी यांच्या रिक्षात बसलेला होता. त्यावेळी रिक्षाचालक सुरेश गायकवाड यांनी कुत्र्याला रिक्षातून हाकलले. याचा राग आल्याने हरीष गायकवाड याने सुरेश गायकवाड आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी शिवीगाळ केली तर सुरेश गायकवाड यांना दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी सुरेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हरीष गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हरीष गायकवाड हा शहरातून फरार होता. तब्बत सहा वर्षानंतर संशयित आरोपी हा जळगावात आला असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार स.फौ. अतुल वंजारी, पो.कॉ. किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी हरीष गायकवाड याला नवीन जोशी कॉलनी येथील राहत्या घरातून अटक केली आहे.

Exit mobile version