Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जैन इरिगेशनच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात १६.२ टक्क्यांची वाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२१-२२  च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली.

 

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दि.३० मे रोजी पार पडली. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रीत उत्पन्नात१६.२ टक्के वाढ दर्शविली आहे. ह्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न ७११९.५ कोटी रुपये आहे जे गतवर्षी याच काळात केवळ ५६६६.९ कोटी रुपये इतके होते. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या वाटचालीविषयी संवाद साधला.

चौथ्या तिमाहिच्या (4QFY22) एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये :

सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवून वार्षिक आधारावर महसूल1१६.२ % ने वाढला. विदेशी बाजारपेठेतील चांगल्या मागणीमुळे हाय-टेक कृषी निविष्ठा उत्पादन विभागाने वार्षिक ६.८ % ची वाढ नोंदवली. सर्व उत्पादनांच्या साखळीमध्ये प्लॅस्टिक विभागाने सर्वाधिक वार्षिक ५०.१ % वाढ नोंदवली. · देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेतील उच्च विक्रीमुळे कृषी प्रक्रिया विभागाने वार्षिक १७.३ % ची वाढ नोंदवली.

· 4QFY22 साठी कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर ११.२ % वरून १२.७ % पर्यंत वाढला. · कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे एकवेळ नफा (अपवादात्मक बाबी) झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.

आर्थिक वर्ष 2022 चा (FY22) एकत्रित निकाल :
भारतासह परदेशातील सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढीमुळे एकूण महसुलात २५.६ % वाढ झाली आहे. हाय-टेक अॅग्री इनपुट प्रोडक्ट्स डिव्हिजनने २०.९ वार्षिक वाढ नोंदवली आहे. प्लॅस्टिक विभागामध्ये ४३.०% वार्षिक वाढीची भरभक्कम वाढ नोंदवली गेली. कृषी प्रक्रिया विभागात लक्षणीय सुधारणा झाली २४.४ % वार्षिक वाढ नोंदवली. FY22 साठी १३.१ % वर कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर ४८७ बेसिस पॉइंटने वाढले. कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे आणि विदेशी उपकंपनीमध्ये बाँड पुनर्रचनेमुळे एकवेळ लाभ झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर कंपनीकडे ३५९२.८ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत, त्यात हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी २०२८.४ कोटी रुपये, प्लास्टिक विभागासाठी ६२७.६ कोटी रुपये आणि कृषी प्रक्रिया विभागासाठी ९३६.२ कोटी रुपयांच्या ऑर्डरचा यात समावेश आहे.

चौथ्या तिमाहिचा (4QFY22) एकल निकाल :
प्लास्टिक उत्पादन विभागातील वाढीमुळे एकूण महसूल १२.२ टक्क्यांनी वाढ झाली. आर्थिक वर्षाच्या (4QFY22) चौथ्या तिमाहित (एकल) कर, व्याज व घसारा पूर्व नफा साठी (EBIDTA) १२.२ टक्के आहे.

आर्थिक वर्ष (FY22) एकल निकाल
एकूण महसूल ३०.७ % ने वाढला. हाय-टेक अॅग्री इनपुट प्रॉडक्ट्स डिव्हिजनने २७.० % वार्षिक वाढ नोंदवली. प्लॅस्टिक विभागामध्ये ३७.७ % वार्षिक वाढ नोंदवली गेली.
सध्यस्थितीत भारतातील (डोमॅस्टिक) हाती असलेल्या ऑर्डर्समध्ये २०५०.३ कोटी आहे ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी १४४७.० कोटी रुपये तर प्लास्टिक विभागासाठी ६२२.८ कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, “आम्हाला कंपनीच्या चौथी तिमाहीचा (Q4) लेखापरिक्षण केलेला आर्थिक निकाल जाहीर करतांना आनंद होत आहे. कंपनीने सर्वांगिण वाढ साध्य केली आहे. कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात २५.६  % वाढ (Y on Y) झाली. आणि (EBIDTA) कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्केने वाढला. तिसऱ्या तिमाही च्या शेवटी आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. मला आनंद होतो की, चौथ्या तिमाहीत सगळ्याच व्यवसायांमध्ये समाधानकारक काम व सुधारणा झाली. मार्च २०२२  शेवटी कंपनीची कर्ज निराकरण योजना अमलात आली आणि कंपनीच्या सर्व भागधारकांनी केलेल्या कठीण परिश्रमामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे कर्ज निराकरण योजना पूर्ण होण्यापूर्वी खेळत्या भांडवलावर मर्यादा आली होती आणि मागील काही वर्षांत कंपनीची कामगिरी मागे पडली होती. त्यात चांगले काम करण्याचा पाया रचला गेला.मागिल FY-२०२१-२२  आर्थिक वर्षांत कंपनीच्या कामकाजात प्रगती झाली आणि त्यात स्थैर्य आले. व्यवसायातील सकारात्मक सुधारणा झाली तरी कच्या मालाच्या किंमतीमध्ये आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत व्यत्यय आले. कंपनीचे लक्ष हातात असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यावर असून थकीत रक्कम वसूली करण्यात देखील लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने किरकोळ विक्रेत्यांचे जाळे विस्तारले. कृषी व्यवसायात करार शेतीचा विस्तार करणे आणि टिश्यूकल्चर व्यवसायात तंत्रज्ञानावर आधारित विस्तार करायचे लक्ष निर्धारित केले आहे.

Exit mobile version