Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे.टी.महाजन स्कूलमध्ये रंगला वारकरी मेळावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील जे. टी. महाजन इंग्लिश स्कुल यावल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आर्कषक वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांच्या मोठया सहभागात उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात दिंड्डी साजरी करण्यात आली.

यावल शहरात २८ जुन रोजी जे. टी. महाराज इंग्लिश स्कुल यावल च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंड्डी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंड्डीत विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी च्या वतीने वारकरींचे सुन्दर व आर्कषित वस्त्र परिधान करून विठ्ठल रुक्मिणी निवृत्तीज् ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तसेच भिंत चालवणारे ज्ञानेश्वर यांचे सचिव देखावे करण्यात आले होते, त्याच प्रमाणे मोठ्या विद्यार्थीनी लेझीम, डबेल्स, टिपरे, टाळ यांच्या तालावर हरीनामा च्या गजर करण्यात आले त्याचप्रमाणे मोठ्या विद्यार्थ्यांनी काडी आघाड्याचे खेळ खेळले मुलींनी वारकरीच्या खेळलेल्या फुगड्या या आकर्षशीत करणाऱ्या होत्या या संपुर्ण सर्व कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या प्राचार्य सौ रंजना महाजन व प्राचार्य  किरण खेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या आषाढी एकादशी च्या निमित्ताने काढण्यात आलेली दिंड्डी स्कुल पासुन शहरातील प्रमुख मार्गाने महाजन गल्लीतील विठ्ठल मंदीरात दर्शन घेतले, भक्तीमय व उत्साहाच्या वातावरण काढण्यात आलेल्या दिंड्डी कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी  शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्यासह स्कुलचे स्कुलचे विद्यार्थीनी विद्यार्थी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात दिड्डी शाळेतून मेन रोड मार्ग महाजन गल्ली विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला दिंडीत पोलीस कर्मचारी प्रशासकांनी देखील अनमोल असे सहकार्य केले

Exit mobile version