Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजद्वारा मोफत सीईटी सराव परीक्षा

फैजपूर, प्रतिनिधी । येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा सराव व्हावा म्हणून मोफत ऑनलाइन सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

जे. टी.  महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे   शनिवार दि. २८ ऑगस्ट, या दिवशी ११ वाजता करण्यात आलेले आहे.विद्यार्थ्यांना सदर प्रकारच्या पाच परीक्षा देता येतील. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी घरूनच मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारा परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याला चाप्टरनुसार रिझल्ट अन्यलिसिस व सोल्युशन पण मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना गुण वाढी साठी खूप फायदा होणार आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात https://www.testkatta.com/stdregeng.php?s=641 विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर मोफत सराव परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष शरद महाजन, संचालक मंडळ, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. डी. नारखेडे, सर्व विभाग प्रमुख, डीन अकॅडमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ जी ई चौधरी 9423974207,डॉ के जी पाटील 9637081291 यांचेशी संपर्क साधावा.

 

Exit mobile version