Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जे. टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘गेट वे टू सक्सेस’ या विषयावर वेबीनार

फैजपूर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | गेट वे टू सक्सेस या विषयावर जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज येथे वेबिनारचे आयोजन करण्यात आले. हा वेबिनार ईकिडा प्रायव्हेट लिमिटेड एज्युकेशन सेंटरचे संचालक प्रणय शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

जे. टी.महाजन इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सर्व शाखांचे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार ला महाविद्यालयातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. यात गेट या इंजीनियरिंग प्रवेश परीक्षेचे महत्व, परीक्षेचा पॅटर्न व नियम याबाबत सर्व माहिती देण्यात आली. यासोबत गेट परीक्षेमुळे उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या खाजगी व शासकीय क्षेत्रातील नोकऱ्या तसेच पब्लिक सेक्टर युनिट (पी.एस. यु.) या क्षेत्रात होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच उच्च शिक्षणासाठी आय.आय.टी, एन.आय.टी.मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता व एम.ई, एम.टेक, एम.एस. आणि पीएच.डी. करण्यासाठी गेट स्कोअर चे महत्व सांगितले. या वेबिनरच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. डी. नारखेडे, अकॅडमिक डीन डॉ. पी. एम. महाजन, सर्व विभाग प्रमुख यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. जी. ई. चौधरी, प्रा. एम. जी. भंडारी, प्रा. ए. बी. नेहेते, प्रा. टी. डी. गारसे, प्रा.जी. डी.बोंडे यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version