Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेवणाची गुणवत्ता तपासण्यासाठी महापौर दररोज कोविड केअर सेंटरमध्ये करणार जेवण !

 

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत काही तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी बुधवारी महापौर भारतीताई सोनवणे यांनी स्वतः सकाळी त्याठिकाणी नाश्त्याचा आस्वाद घेतला. एवढेच नव्हे तर, कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राहावी यासाठी महापौर स्वतः दररोज त्याठिकाणी नाश्ता आणि जेवण करणार आहे.

 

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाबाबत महापौरांकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असल्याने बुधवारी सकाळी महापौर भारतीताई सोनवणे स्वतः त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक उपस्थित होते. महापौर भारतीताई सोनवणे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये मिळालेल्या नाश्ताचा आस्वाद घेतला. बुधवारी सकाळी रुग्णांना उस, खाकरा व मोसंबी देण्यात आले होता. कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राहावी यासाठी महापौर स्वतः दररोज त्याठिकाणी नाश्ता आणि जेवण करणार आहे.

Exit mobile version