Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेईई परीक्षा लांबणीवर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – : राज्यासह देशपातळीवर घेण्यात येणारी जेईई परीक्षा दोन महिने लांबणीवर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ‘आयआयटी’ सह अन्य केंद्रीय संस्थांमध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर सामायिक ‘जेईई’ मुख्यप्रवेश राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून परीक्षा घेतली जाते. हि जेईई मेन परीक्षा मी महिन्याच्या सुरुवातीस होणार होती, ती आता सुमारे दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून या परीक्षेचे पहिले सत्र जून तर दुसरे सत्र जुलैमध्ये होणार आहे.

‘जेईई’ परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून त्याची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २१ एप्रिल ते ४ मे दरम्यान परीक्षेचे पहिले तर २४ ते २९ मे दरम्यान दुसऱ्या सत्रातील परीक्षा होती. परंतु आता सुधारित वेळापत्रकानुसार पहिले सत्र २० ते २९ जून आणि दुसरे सत्र २१ ते ३० जुलै दरम्यान परीक्षा घेतल्या जातील. एनटीएच्या संकेतस्थळावर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचे देखील अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून देशातील ५४३ तर परदेशातून १४ शहरांमध्ये नीट परीक्षा होणार आहे.

Exit mobile version