Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जून्या वादातून दोन तरुणांवर चॉपर हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जून्या वादातून रामेश्वर कॉलनीत दोन तरुणांवर चॉपर हल्ला झाल्याची घटना रविवारी ४ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन निंबा राठोड (वय-२४) व सचिन कैलास चव्हाण (वय-२२) दोघ गंभीर जखमी झाले. यातील नितीन राठोड याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीत नितीन राठोड व सचिन चव्हाण हे वास्तव्यास आहे. लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मेहरुण परिसरातील तुषार सोनवणे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहे. दरम्यान, या वादाच्या कारणावरुन रविवारी ४ डिसेंबर रोजी ८.१५ वाजेच्या सुमारास सुमारास नितीन हा घराबाहेर उभा असतांना तुषार सोनवणे हा कारमध्ये काही तरुणांसोबत आला. त्याने नितीनला जवळ बोलावून घेत त्याच्यावर चॉपरसारख्या शस्त्राने वार केले. दरम्यान, नितीनवर वार होत असल्याचे समजताच त्याचा आतेभाऊ सचिन हा त्याठिकाणी आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील वार करुन जखमी करीत हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version