Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून शेतातील पिकांचे नुकसान

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरूणाच्या शेतातातील कपाशीचे झाडे उपटून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील रहिवाशी स्वप्निल त्र्यंबक महाले (वय-२१) या तरूणाचे नांद्रा शिवारातील ३२० शेत गटमध्ये शेती आहे. शेतात त्याने कपाशी पिकाची लागवड केलेली आहे. दरम्यान स्वप्निलचे गावातीलच ज्ञानेश्वर आंबादास पाटील याच्यासोबत जुना वाद आहेत. या वादातून २४ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील याने स्वप्निल महालेच्या शेतातील कपाशी झाडे वाकून काही झाडे उपटून फेकून दिली. यामुळे ८ ते ९ हजारांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्वप्निल महाले याने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस नाईक मुकुंद परदेशी करीत आहे.

Exit mobile version