Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून दोघा भावांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील बाजारपट्टा भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणासह त्याच्या भावाला दोन जणांनी चाकू मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सादिक चांद देशमुख (वय-१८, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २१ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शादीक देशमुख यांचा भाऊ याचे सुरज आणि भावेश (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासोबत भांडण सुरू झाले होते. त्यावेळी सादिक देशमुख हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता यातील भावेशने हातातील चाकूने वार करून उजव्या हाताच्या खांद्यावर गंभीर दुखापत केली तसेच सूरजने हातातील प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करून दोघा भावांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या सादिकला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात सादिक चांद देशमुख यांच्या फिर्यादीवरून सुरज आणि भावेश (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.

 

Exit mobile version