Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुना खेडी रोडवरील श्री कृष्ण नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला बेद मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्र उर्फ लहान्या अशोक महाजन (वय-३१) रा. जुना खेडी रोड तळेले कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार २० एप्रिल रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून श्रीकृष्ण नगरात राहणारा पिंटू याच्यासह त्याची पत्नी व दोन मुली यांनी महेंद्र महाजन यांला अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी पट्टी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महेंद याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महेंद्र महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय शेलार करीत आहे.

Exit mobile version