Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे सिम गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह भाऊ यांना बेदम मारहाण केली तर कुटुंबीयांना अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0

 

धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय लीलाचंद पाटील (वय-४३) रा. पिंपळे सिम ता. धरणगाव हे आई व पत्नी यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे मणिलाल रूपसिंग पवार, दीपक मणिलाल पवार, दीपक राजाराम पवार, जितेंद्र मनीलाल पवार सर्व रा. पिंपळे सिम ता. धरणगाव यांनी संजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने लाकडी दांड्याने वार करून दुखापत केली. भांडण सुरू असताना संजय पाटील यांचा भाऊ ज्ञानेश्वर पाटील हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याला देखील बेदम मारहाण केली. तसेच संजय पाटील यांची पत्नी आणि आई यांना अश्लिल शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर संजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली, त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता ४ जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.

Exit mobile version