Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून काळे नगरात तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर परिसरातील काळे नगरात राहणारा ३२ वर्षीय तरूणाला जुन्या वादातून लोखंडी तिक्ष्ण हत्यारासह दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना  शनीपेठेतील गवळी वाडा येथे आज दुपारी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

अधिक माहिती अशी की, कुंदन सुरेश पाटील (वय-३२) रा. धनश्याम काळे नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींग काम करून उदरनिर्वाह करतो. गेल्या आठवड्यापुर्वी शिवाजी नगरात पत्ते खेळण्याच्या कारणावरून कुंदन सोबत काही तरूणांनी वाद घातला होता. आज रविवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान दुचाकीने भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आठवड्यापुर्वी झालेल्या जुन्या वादातून आज तीन ते चार जणांनी गोपाळपूरा येथे अचानक हल्ला करून दगड व तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. जखमीवस्थेत तरूणाला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तरूणाची परिस्थिती गंभीर असून बेशुध्द आहे. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Exit mobile version