Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणावरून दोन जणांना बेदम मारहण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात जुन्या वादातून एका तरूणासह त्यांच्या काकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशिक ईश्वर जाधव (वय-२०) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घरात घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून सम्राट सोनवणे (पुर्ण नाव माहित नाही) यासह इतर दोन जणांनी बेदम मारहाण केली. तसचे प्रशीक जाधवचा काका भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यांला देखील बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर प्रशिक जाधव याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सम्राट सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजित खॉ तडवी करीत आहे.

Exit mobile version