जुन्या भांडणावरून तरूणाच्या डोक्यात मारली विट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील दुर्गादेवी मंदीराजवळ राहणाऱ्या तरूणाला जुन्या वादातून शिवीगाळ करत विट मारून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पंकज गणेश मिस्तरी (वय-२१) रा. दुर्गादेवी मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता  पंकज मिस्तरी हा तरूण हा घरी असतांना जुन्या वादातून मयूर धनगर याने अश्लिल शिवीगाळ केली व  तु मला आताच पैसे दे नाही मी तुला मारेल अशी धमकी दिली. जवळच असलेले विट पंकजच्या डोक्यात मारली. विट मारल्याने दुखापत झाल्याने तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी गुरूवारी २५ मे रोजी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रारी दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मयूर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील करीत आहे.

Protected Content