Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या वादातून महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथील ३० वर्षीय विवाहितेला पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून चार जणांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेखा संदीप सोनवणे (वय-३०) रा. खेडी ता. जि. जळगाव ह्या मोलमजूरी करून आपल्या कुटुंबिचा उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडण्याच्या कारणावरून सुरेखा सोनवणे यांनी तालुका पोलीसात गल्लीतील नितीन भरत केदार, काजन दिनेश सोनवणे आणि शिला भरत केदार रा. खेडी ता.जि.जळगाव आणि तुळसाबाई गौतम ब्रामणे रा. लढावण ता. अमळनेर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून चौघांनी सुरेखा सोनवणे यांना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातील संशयित आरोपी नितीन केदार याने लाकडे दांडूके हातात घेवून सुरेखा सोनवणे यांच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय सोनवणे करीत आहे. 

Exit mobile version