Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून खंडेराव नगरातील तरूणाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खंडेराव नगरात लतीफ शकील पिंजारी (वय-२२) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता लतीफ हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गिरीष घुगे, सचिन चव्हाण आणि गंप्या पुर्ण नाव माहित नाही तिघे रा. जळगाव यांनी अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर लतीफने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता संशयित आरोपी गिरीष घुगे, सचिन चव्हाण आणि गंप्या पुर्ण नाव माहित नाही तिघे रा. जळगाव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.

Exit mobile version