Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर विळ्याने वार

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली आहे. याबाबत रविवार ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सुभाष ढगे (वय-२८) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी ता. जामनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारे समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले यांनी जुन्या भांडणाची पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सागर याला शनिवारी १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गावातील पाण्याच्या टाकीजवळ पकडून समाधान पाटील व संदीप काटोले या दोघांनी लोखंडी विळ्याने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत सागरला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात सागर ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी समाधान बळीराम पाटील आणि संदीप रामदास काटोले दोन्ही रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी या दोघांनी विरोधात रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील समाधान पाटील याला पोलिसांनी अटक केली आहेत तर दुसरा फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Exit mobile version