Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून कुटुंबातील चौघांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून भडगाव येथे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरातील पेठ भागात निलेश माधवराव पाटील आणि रमेश राजू पाटील हे शेजारीशेजारी राहतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची होवून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. निलेश पाटील, माधवराव पाटील, मंजाबाई पाटील आणि भाची अर्चना पाटील हे जखमी झाले. त्यांना भडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रमेश राजू पाटील, शांताराम जिवराम पाटील, राजू जिवराम पाटील तिघे रा. भडगाव ता. भडगाव जि.जळगाव यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.

Exit mobile version