Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज । जळगाव शहरातील तांबापुरा भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण करून खिशातील रोकड आणि अंगठी जबरी काढून चोरी केल्याची घटना मंगळवार ९ मे रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तबस्सूम आरा इक्बाल खान (वय-२१, रा. गौतम नगर, तांबापुरा,जळगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार ९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संजना फरहान शेख, फरहान शब्बीर शेख दोन्ही रा. गौतम नगर, तांबापुरा यांनी तबस्सुम आरा इकबाल खान याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील रोकड आणि हातातील अंगठी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात तबस्सूम आरा इक्बाल खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजना फरहान शेख, फरहान शब्बीर शेख यांच्या विरोधात रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.

Exit mobile version