Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांकडून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विदगाव येथे अंडा बिर्याणी गाडीवर येवून चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणवरून तरूणाला अचानक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन भानूदास कोळी (वय-३३) रा. विदगाव ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चेतन कोळी हा रविवारी ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील अंडा बिर्याणी गाडीवर असतांना भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन श्रावण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर सर्व रा. विदगाव ता.जि.जळगाव हे चौघे तिथे आले. बोलचाल सुरू असतांना अचानकपणे चौघांनी चेतन कोळी याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यातील भगवान कोळी याने हाताील लोखंडी रॉड चेतनच्या डोक्यात मारला. तर इतरांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी चेतन कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन श्रावण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर सर्व रा. विदगाव ता.जि.जळगाव या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वासूदेव मराठे करीत आहे.

Exit mobile version