Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या नोटा किंवा नाण्यांची खरेदी विक्रीच्या बनावट ऑफरला बळी पडू नका

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । जुन्या नोटा किंवा नाण्यांची खरेदी विक्रीच्या बनावट ऑफरला बळी पडू नये, असं आरबीआयनं स्पष्ट केलंय.

 

 

आजकाल सोशल मीडियावर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीसंदर्भात अनेक प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. जर तुमच्याकडे असे नाणे किंवा नोट असेल तर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. RBI ने अशा बातम्यांसंदर्भात एक प्रेस रिलीज जारी केले आणि ग्राहकांना त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलाय.

 

खरं तर काही घटक आरबीआयच्या नावाने सामान्य लोकांकडून वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून फसवणुकीद्वारे जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये शुल्क किंवा कमिशनची मागणी करत आहेत. अशा जाळ्यात सामान्यांनी अडकू नये, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

 

आरबीआय जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासारख्या कोणत्याही व्यवहारात सामील नाही आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन किंवा पैसे घेत नाही. केंद्रीय बँकेने एका ट्विटद्वारे सांगितले आहे की, आरबीआयच्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला किंवा कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार देण्यात आलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न पडण्याचा सल्ला दिलाय. यापूर्वीही वेळोवेळी आरबीआय ग्राहकांना अशा फसवणूक टाळण्यासाठी अलर्ट जारी केलाय.

 

अशा व्यवहारामध्ये आपल्या वतीने फी/कमिशन गोळा करण्यासाठी कोणत्याही संस्था/फर्म/व्यक्ती इत्यादींना अधिकृत केलेले नाही, असंही आरबीआयनं नमूद केलेय. तसेच अशा फसव्या ऑफरद्वारे पैशांची गैरव्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आरबीआयचे नाव वापरून फसवणूक करणाऱ्यांना बळी पडू नका, असा सल्लाही सामान्यांना मध्यवर्ती बँकेने दिलाय.

 

Exit mobile version