Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुनोना शिवरातून इलेक्ट्रिक केबलची चोरी; बोदवड पोलीसात गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील जुनोना शिवारातून शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या १ लाख ८६ हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रिक केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर दगडू पाटील (वय-५३) रा. जुनोना ता. बोदवड यांचे जुनोना शिवारात शेत आहे. शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २० जुलै रोजी रात्री ९ ते २१ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील १ लाख ८६ हजार ५४० रूपये किंमतीची इलेक्ट्रिक केबल वायर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. शेतात शोधाशोध केली असता मिळून आली नाही. याप्रकरणी प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालीचरण बिऱ्हाडे करीत आहे. 

Exit mobile version