Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुने जळगावात विहिरीत उडी घेऊन वृद्धेची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील जुने जळगाव भागात राहणाऱ्या ८५  वर्षीय वृद्धेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी २  वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मथुराबाई भिवा महाजन (वय ८५ रा.जुने जळगाव) असे मयत झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मथुराबाई महाजन या आपला मुलगा रवींद्र भिवा महाजन,  सुनबाई यांच्यासह राहतात. मुलगा रवींद्र महाजन हे एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहे. दरम्यान आज सकाळी १२  वाजेच्या सुमारास वयोवृद्ध महिला घरातून बाहेर पडल्या. त्यांनी मेस्को माता नगरात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेव्हा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

 

Exit mobile version