जुने जळगावातील गोपाळपुरा येथील प्रौढ व्यक्ती बेपत्ता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुने जळगावातील गोपाळपुरा येथील ४५ वर्षीय व्यक्ती गेल्या दोन दिवसांपासून घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष बाबुराव राणे (वय-४५) रा. गोपाल पुरा, जुने जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. भाजीपाला विक्री करण्याचे काम करतात. शनिवार १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेले. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू ते कुठेही आढळून आले नाही. रविवारी १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांचा पुतण्या चेतन कैलास राणे यांनी माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content