Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड, १६ जुगारांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर सुरू असलेलया जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी सकाळी ४ वाजता छापा टाकून सुमारे ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केले असून १६ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मोरगाव येथे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ६ मार्च रोजी पहाटे ४ वाजता धडक कारवाई करून छापा टाकला. प्रल्हाद पुंडलीक पाटील यांच्या घराच्या आत वॉल कंम्पाउड मध्ये हा जुगार खेळ सुरू होता. पोलीसांनी धडक कारवाई केली. यावेळी अचानक पोलीस आल्याचे दिसतात जुगारी पळवाट दिसेल तिकडे पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करुन १७ जणांना ताब्यात घेतले. यात  संदीप दिनकरराव देशमुख (वय-४८) रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, संजय दर्शन गुप्ता, शांताराम जीवराम मंगळकर, रा. लालबाग, मध्यप्रदेश, समधान काशिनाथ कोळी रा. सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर , कैलास नारायण भाई रा. भाईवाडा ता. रावेर, मनोज दत्तू पाटील रा. पिंप्री ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर, सुधिर गोपालदास तुलसानी रा. बऱ्हाणपूर, रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी ता. पुर्णाड ता. मुक्ताइ्रनगर, राजू सुकदेव काळे रा. बऱ्हाणपूर, युवराज चिंधू ठाकरे रा. रावेर, सोपान एकनाथ महाजन रा.बऱ्हाणपूर, प्रल्हा पुंडलिक पाटील रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर यांच्यासह इतरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलीसांनी १ लाख ४६ हजारांची रोकड, ८ चारचाकी वाहने, ६ दुचाकी असा एकुण ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, संतोष मायकल, किरण धनगर, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, प्रमोद ठाकूर तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोउनि बाळासाहेब नवले, पो.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे यांच्यासह आदींनी कारवाई केली आहे.

Exit mobile version