Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एम. फाऊंडेशन व रोटरीतर्फे मोफत रूग्णवाहिका

जळगाव प्रतिनिधी । संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील रूग्णांसाठी जी.एम. फाऊंडेशन आणि रोटरी जळगाव ईस्ट यांनी संयुक्तपणे मोफत रूग्णसेवा उपलब्ध करून दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी रोटरी जळगाव ईस्ट आणी जी. एम. फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मोफत रुग्णवाहिका सेवा घरपोहोच उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रूग्णांसाठी गंभीर स्थितीतील रुग्णांच्या मदतीसाठी गरजूंनी रोटरी जळगाव ईस्टचे पदाधिकारी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधल्यास ते डॉक्टर रुग्णवाहिका घेऊन रुग्णाच्या घरी पोहचतील आणि रुग्णावर घरीच उपचार करण्यासारखी स्थिती असल्यास घरीच उपचार करण्यात येतील. अथवा रुग्णांना संबंधित दवाखान्यात रुग्णवाहिकेने घेवून जाण्यात येईल. या उपक्रमासाठी जळगाव जिल्हा व्यवस्थापन विभाग यांचे सहकार्य लाभत आहे. गरजूंनी अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील (९७६३३७६३५४), सचिव वीरेंद्र छाजेड, आरोग्यदूत अरविंद देशमुख (९४०५६७०३८७ / ७०५८८७२५२५) (९४२३५२१९४४), डॉ. जगमोहन छाबडा (९८२३०९२१३९) यांच्याशी अथवा स्टेडीयम कॉम्पलेक्समधील विनोद ईजिनिअंरिग या ठिकाणी ०२५७ – २२३३८६६ संपर्क साधण्याचे आवाहन अरविंद देशमुख आणी संजय गांधी यांनी केले आहे.

Exit mobile version