Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रीडा सप्ताह   

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने महाविद्यालयात दिनांक २० डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला.

क्रीडा सप्ताहाच्या औपचारिक कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. रायसोनी इस्टीट्युटचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वांगीण विकास करणे असल्याने जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या क्रीडा सप्ताहमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये क्रिकेट, कॅरम,बुद्धिबळ इत्यादी खेळांचा समावेश होता.

सदर महाविद्यालयीन क्रीडा सप्ताह पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक जयंत जाधव, क्रीडाशिक्षक राहुल धुळणकर, ममता प्रजापत, प्रा. संदीप पाटील, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियंका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. सुप्रेश पगारे, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी, प्रा. निकिता वालेचा व इतर शिक्षकेतर कर्मचारी अनिल सोनार व संतोष मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version