Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जळगाव शहारालगत असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनी “टोयोटो”ला भेट दिली.

 

या भेटीचा मुख्य उद्देश हा ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा कल समजुन घेणे व त्याला आत्मसात करणे हा होता. या क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल चे प्रत्यक्षात प्रात्यक्षिके पाहिली. तसेच जळगावच्या टोयोटो युनिट सर्विस इंजिनिअर निखील जाधव व तौसीफ खान यांनी यावेळी विध्यार्थ्यांना वाहनांची सर्विसिंग त्यांचे मेंटेनन्स, वाहनांमधील BS4 व BS6 मधील फरक, भविष्यातील वाहनांचे नवीन तंत्रज्ञान त्यांची सेफ्टी, अद्यावत सॉफ्टवेअर, सुरु असलेले विविध आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट बद्दल तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात डिमांड असलेल्या टेक्नॉलॉजी संदर्भात मार्गदर्शन केले.

 

तसेच ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये करीअर अपॉरच्युनिटी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचे उपसंचालक व अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या मार्गदर्शनाने या दौऱ्याचे नियोजन केले होते त्यांनी यावेळी नमूद कि, विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते याचा परिचय झाला पाहिजे तसेच या अभ्यास दौऱ्यातील काही मुद्धे विध्यार्थ्याना मेकॅनिकल विषयात उपयोगी पडतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल तसेच या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल या तंत्रज्ञान क्षेत्रात नौकरी मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल ज्ञान मिळाले व “टोयोटो” सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. यानंतर या अभ्यास दौऱ्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असुन भविष्यात होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये याचा नक्कीच फायदा होईल अश्या प्रतिक्रीया दिल्या. सदर अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजना करीता मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रा. अमोल जोशी, प्रा. रामकांत पाटील  व आदींनी विशेष परीश्रम घेतले. या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Exit mobile version