Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एच. रायसोनीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून जिल्हा उद्योग केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.

 

यावेळी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले तर जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे, उपव्यवस्थापक दिनेश गवळे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर एस. पी. लासूरकर, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात राज्य शासनाने जिल्हा उद्योग केंद्र यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे पाऊल टाकले आहे. खानदेशात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या हितासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने जिल्हा उद्योग केंद्रासोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराचा मुख्य हेतू जिल्हा उद्योग केंद्राचे लाइव्ह प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल विजिट, गेस्ट लेक्चर, सेमिनार, इंट्रप्रनरशिप डेवलपमेंट प्रोग्राम तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार याच्या युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार व उद्योजकता विभागाच्या विविध योजनाची माहिती विध्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हा असून यामुळे महाविद्यालयातील सर्व विध्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version