Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘जीसॅट-३०’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपकाच्या सहाय्याने शुक्रवारी दक्षिण अमेरिकेच्या उत्तर-पूर्व किनारपट्टीवरील कैरो बेटावरुन पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी या उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. २०२० मधील इस्त्रोचे हे पहिले मिशन असून या आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेट स्पीडला गती मिळणार आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाशात आणखी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद केलीय. सर्वाधिक सशक्त अशा जीसॅट-३० या उपग्रहाने अवकाशात यशस्वी झेप घेतलीय. युरोपीय एरियन-५ या यानाच्या साथीने जीसॅट-३०चे उड्डाण यशस्वी करून दाखवण्यात भारतीय शास्त्रज्ञांना अखेर यश आलेय. भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री २ वाजून ३५ मिनिटांनी जीसॅट ३० उपग्रहाने एरियन ५च्या साथीने अंतराळात झेप घेतली आणि शास्त्रज्ञांचे चेहरे खुलले. जीसॅट ३० इन्सॅट ४ एची जागा घेईल आणि अधिक क्षमतेने काम करेल. इन्सॅट ४ ए २००५ साली लॉन्च करण्यात आला होता. जीसॅट ३० मुळे इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या लॉन्च झालं. याचसोबत भारतानं यंदाचं अर्थात २०२० मधलं पहिलं मिशन यशस्वीरित्या पार पाडलंय. हा उपग्रह टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यासाठी मदत करणार आहे. या उपग्रहाचं वजन जवळपास ३१०० किलो आहे. लॉन्चिंगनंतर १५ वर्षांपर्यंत हा उपग्रह काम करू शकेल. यामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे त्यामुळे हा काम करू शकेल.

Exit mobile version