Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीवघेणा हल्ला करणाऱ्याला सुनावली तीन वर्षाचा सश्रम कारावास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराच्या डोक्यात बेसबॉल खेळण्याचे स्लगर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांनी ३ वर्षाचा सश्रम कारावास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील रहिवाशी ईश्वर लक्ष्मण लोखंडे हे १ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांच्या दुचाकीने जात असतांना ऑटोरिक्षाचा धक्का लागला. रिक्षाचालक उमेश रामा ठोंबरे रा. चाळीसगाव यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रिक्षा चालकाने बेसबॉल खेळण्याचे स्लगर ईश्वर लोखंडे यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या उमेश ठोंबरलेा २ डिसेंबर २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास विजय कुमार बोत्रे करीत होते. त्यानुसार त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात ईश्वर लोखंडे आणि साक्षिदार यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायमुर्ती जे.जे.माहिते यांनी उमेश रामा ठोंबरे याला दोषी ठरवत ३ वर्ष सश्रम कारवास आणि १० हजाराचा दंडाची शिक्षा शुक्रवारी २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

Exit mobile version