जीवघेणा हल्लाप्रकरणात ११ वर्षांपासून फरार संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जीवघेणा हल्लाप्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ११ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी सुप्रिम कॉलनीतून गुरूवारी २ मार्च रोजी रात्री १० वाजता अटक केली आहे. पुढील कारवाई करून संशयित आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाबू दासू अडसूळ रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०१२ मध्ये शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बाबू अडसूळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल ११ वर्षांपासून संशयित आरोपी बाबू हा फरार होता. संशयित आरोपी हा सुप्रिम कॉलनीत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ सतीश गर्जे, शुध्दोधन ढवळे, सिद्धेश्वर लटपटे, जितेंद्र राठोड, समाधान टाक यांनी गुरूवार २ मार्च रेाजी रात्री १० वाजता कारवाई करत संशयित आरोपी बाबू अडसूळ याला अटक केली. वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content