Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीर्ण खांब उठला जिवावर : तक्रार करूनही महावितरणचे दुर्लक्ष

यावल,  प्रतिनिधी । यावलच्या मुख्य रस्त्यावरील भाजी बाजार येथे महावितरणाचा वीज वाहक खांब  गंजल्याने एका बाजूला झुकला आहे.  हा खांब कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होवू शकत असल्याने हा खांब लवकरात लवकर बदलविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

 

या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवत बाजार हे क्षेत्र भाजीपाला विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते.  याच ठिकाणी मुख्य रस्त्यावरील  वळणावरील विद्युत खांब पुर्णपणे गंजला असून जीर्ण झाला आहे.  तो कुठल्याही क्षणी कोसळण्याची भिती या परिसरातील नागरीक  व्यक्त करीत आहेत.  याबाबत त्या वळणावर रहीवाशी असलेले उच्च शिक्षीत तरूण अनिल त्र्यंबक पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी मागणी करून  व दिनांक १७ नोव्हेंबर  २०२० रोजी यावल येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना लिखित तक्रार अर्ज दिला आहे. मात्र मागील नऊ महीन्यांपासुन या संदर्थात अद्याप महावितरण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. या मार्गावरील विद्युत खांबाच्या ठिकाणी जवळपास रोज भाजी बाजार भरत असतो व ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची व वाहनांची खूप मोठी गर्दी असते. जर हा जीर्ण  झालेला खांब पडला किंवा वाहनाने धडक देवुन कोसळल्यावर खूप मोठी जीवित व वित्तहानी  होऊ शकते असे तक्रारीत म्हटले आहे. महावितरणच्या कार्यालयामध्ये रितसर तक्रार करूनसुद्धा जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत असेलेला खांब बदलण्यात आलेला नाही. श्री. पाटील यांनी  भविष्यात जर काही अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार राहील. तरी यावलच्या महावितरण. विभागाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेवुन तात्काळ या ठिकाणावरील जीर्ण खांब बदलावा अशी मागणी केली आहे.

Exit mobile version