जि.प.पं.स. च्या गण गटासाठी ७४ हरकती

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गण गट रचनेसंदर्भात जिल्हा प्रशासनास ७४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यांची सुनावणी आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे घेण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांचे गण रचना प्रारूप आराखडा फेब्रुवारी मार्च अखेर करण्यात आला होता. यावर
ओबीसी आरक्षण मुळे काही कालावधीसाठी गण गट रचना प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास विलंब झाला होता. अखेर उच्च न्यायालय आदेशानुसार मे महिन्यात प्रारूप आराखडा प्रसिद्ध होऊन त्यावर ७ जून पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

यात जिल्हा भरातून गण गटासाठी ७४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यात सर्वात जास्त सुमारे १२ हरकती चाळीसगाव तालुक्यातील आहेत. या हरकतीवर आज नाशिक विभागीय कार्यालयात सुनावणी घेण्यात आली असून  हरकतीचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Protected Content