Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अखिल भारतीय जिवा सेना जळगाव शहर येथे शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 9 रोजी इच्छा देवी चौक येथे संध्याकाळी 5 वाजता जिवाजी महाले यांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता बँकेचे ब्रांच मॅनेजर डी.एल. महाले यांनी भूषविले.

या प्रसंगी अखिल भारतीय जिवा सेना युवक प्रदेशाध्यक्ष देवीदास भाऊ फुलपगारे, माजी नगरसेवक पृथ्वीराजभाऊ सोनवणे, नितीन मंधान, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल वाघ, जिल्हा सचिव जगन वखरे, सेन समाज दिल्ली बोर्ड सदस्य रवींद्र बोरनारे, जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, जिल्हा सहसचिव संजय सोनवणे, खोंडे बंधू ज्वेलर्सचे संचालक संतोष खोंडे, जेष्ठ पत्रकार मोहन साळवी, नाभिक हितवर्धक संघ शहराध्यक्ष अरुण वसाने, सचिव अनिल निकम, माजी शहर अध्यक्ष जगदीश निकम, जिवा सेना शहर उपाध्यक्ष राहुल नेरपगारे, सामाजिक कार्यकर्ते विकास फुलपगारे, समाधान बोरसे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नगराज सिरसाठ, पद्माकर निकम, जिवा सेना शहर संपर्क प्रमुख राजू जगताप, शहर संघंटक भूषण आंबेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब महाले यांनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन देविदास फुलपगारे यांनी केले.

Exit mobile version