जिल्ह्यात ३ हजार प्रवाशांना घेऊन धावली लालपरी

जळगाव, प्रतिनिधी | एस.टी. महामंडळाचे शासनात विलणीकरणासाठी जवळपास अडीच महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, परिवहन विभागातर्फे कंत्रंाटी कर्मचार्‍यांची भरतीची जाहिरात निघताच बरेच कर्मचारी स्वेच्छेने कामावर रुजू झाल्याने व नियमित कर्मचारी देखील कामावर हजर झाल्याने जिल्ह्यात लालपरी पुन्हा गतिमान झाल्याचे चित्र पहायावास मिळत आहे. आज शिवशाही १० तर साध्या बसेसच्या १११ फेऱ्यात ३३९४ जणांनी प्रवास केला.

मागील दोन दिवसांपासून आतापर्यंत ७९२ एसटीचे नियमित कर्मचारी कामावर कार्यरत आहेत. तसेच नव्याने कंत्राटी कर्मचारी देखिल आल्याने जिल्हयात गुरूवार व शुक्रवारी सुमारे ७६ बसेस धावल्या. आज मकर संक्रांतीच्या पर्वावर गर्दी कमी दिसत असली तरी जिल्ह्यातील बर्‍याच आगारातून ७६ बसेस मधून २ हजार २४७ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग प्रमुखंानी दिली. जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या ७५-८० दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचार्‍यांचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. आतापर्यंत शासन प्रशासनपातळीवरून कर्मचार्‍यांचा संप मिटण्यासाठी काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी विलीनीकरणासह अन्य मुद्दयावर संप सुरू आहे. अशाही परिस्थितीत संपावर तोडगा म्हणून ५ जानेवारी रोजी प्रशासन व परिवहन वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कंत्राटी चालक पदासाठी जाहिरात देण्यात आली. त्यांनतर मात्र काही अंशी एसटीच्या चाकांना बर्‍याच ठिकाणी गती आली आहे.

गुरूवारी ७६ बसेसमधून २२४७ प्रवाशांनी केला प्रवास

जळगाव विभागातील ११ आगरापैकी बर्‍याच आगारातून बसेस धावल्या. यात नाशिक २, औरंगाबाद ३, धुळे २ शिवशाही बसेस तर धुळे २, चाळीसगाव १, शिंदखेडा१, पारोळा ४, अमळनेर ६, अमळनेर शिंदखेडा १, अमळनेर नाशिक ३, धुळे ३ अमळनेर पाचोरा २, औरंगाबाद चाळीसगाव १ यासह जामनेर, भुसावळ मुक्ताईनगर, यावल, रावेर अशा सुमारे ७६ बसेस विविध आगारातून धावल्या. या बसेसच्या माध्यमातून २२४७ प्रवाशांनी प्रवास केला. सर्वात जास्त रावेर जळगाव २२३, पाचोरा चाळीसगाव २१० तर अमळनेर पारोळा १०१, अमळनेर जळगाव १७५ या मार्गावर प्रवाशांचा बर्‍यापैकी प्रतिसाद आहे.

शुक्रवारी १२१ बसेसमधून ३३९४ प्रवाशांनी केला प्रवास

जळगाव विभागातील ११ आगरापैकी बर्‍याच आगारातून बसेस धावल्या. यात १११ सध्या तर १० शिवशाही बसेस धावल्या. यात नाशिक ३, औरंगाबाद ३, धुळे ४ शिवशाही तर धुळे, चाळीसगाव, सिंदखेडा, पारोळा, अमळनेर, पाचोरा, चोपडा, दोंडाईचा आदी ठिकाणी साध्या बसेस धावल्या. यात सर्वात जास्त रावेर जळगाव १३ फेऱ्यात ३७३  तर अमळनेर ते जळगावच्या १० फेऱ्यात २९५ प्रवाशांनी लाभ घेतला. आज एकूण ३३९४ प्रवाशांनी प्रवास केला.

 

जळगाव विभागात १४५३ चालक, १४२७ वाहक, ८४७ कार्यशाळेत तर ५३३ प्रशासकिय असे ४२६० कर्मचारी परिवहन महामंडळाच्या सेवेत आहेत. त्यापैकी ६६ साप्ताहिक सुटी वा दौर्‍यावर आहेत. १४८ कर्मचारी अधिकृत रजेवर असून ७९२ कर्मचारी प्रत्यक्ष कामावर आहेत. तर ३२५४ कर्मचारी अजूनही संपावर आहेत.

निलंबितसह बडतर्फ नोटीस संख्या अधिक
जळगाव विभागातील ३२५४ संपकरी कर्मचार्‍यांपैकी आतापर्यत (संचित) ३८५ निलंबित कर्मचारी संख्या आहेत. (संचित) सेवासमाप्ती केलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ८६, प्रशासकीय बदल्या (संचित) करण्यात आलेले ३९, (संचित) बडतर्फ नोटीस बजावलेले ११९, आतापर्यंत (संचित) बडतर्फ कर्मचारी ९८ आहे. तसेच शुक्रवार १४ जानेवारी रोजी ७ कर्मचार्‍यांना बडतर्फची नोटीस बजावण्यात आली असल्याचे परिवहन अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Protected Content