Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात ३९ रूग्ण कोरोना बाधित

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ३९ रूग्ण आढळून आले आहे. तर ५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात दहा तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

आजची आकडेवारी

अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यात आज एक रूग्ण आढळले नाहीत. तर जळगाव शहर-११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१९, चोपडा-२, यावल-१, चाळीसगाव-५ रूग्ण असे एकुण जिल्ह्यात आज ३९ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार ५८९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ७६० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५५७ रूग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली आहे.

Exit mobile version