Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात हाहाकार : आज ११४ नवीन पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११४ नवीन रूग्ण आढळून आले असून यात अमळनेर, पारोळा, जामनेर, जळगाव व भुसावळातील रूग्ण सर्वाधीक आहेत. सलग दुसर्‍या दिवशी १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज अमळनेरात ३९; पारोळा २१; भुसावळ १६; जामनेर ११; जळगाव शहर ९; धरणगाव ३; यावल व एरंडोल ५; जळगाव ग्रामीण ४ व बोदवड १ या रूग्णांचा समावेश आहे.

प्रारंभी अमळनेरात जास्त रूग्ण आढळून आले असले तरी मध्यंतरी येथील संख्या कमी झाली होती. तथापि, गत काही दिवसांपासून येथील बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात आज नवीन ३९ रूग्ण आल्याने तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे भुसावळ शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सातत्याने १० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. जामनेर तालुक्यातही आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे आजच्या आकडेवारीतून दिसून आहे. आहे.

पारोळा तालुक्यानेही बराच काळ कोरोनाचा संसर्ग थोपवून धरला होता. यामुळे लॉकडाऊनमध्ये बर्‍याच दिवसांपर्यंत हा तालुका ग्रीन झोनमध्ये होता. तथापि, गत काही दिवसांपासून येथील रूग्णसंख्येत नित्यनेमाने वाढ होत असून यात आज तब्बल २१ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह आल्याने तेथील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, आजच्या ११४ रूग्णांची संख्या जोडली असता आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १३९५ पर्यंत पोहचली आहे. तर, कालपर्यंत ५६७ रूग्ण बरे झाले होते असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Exit mobile version