Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात रेशन वाटपात मोठा घोटाळा; दीपककुमार गुप्ता (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | कोरोना काळात जळगाव तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये रेशन धान्याचा मोठा काळाबाजार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यात एकूण १२३ रेशन दुकान आहे. जवळपास एका दुकानातून १० क्विंटल धान्याचा काळाबाजार होत आहे. त्यातच धरणगाव, पाचोरा, पारोळा येथील रेशनदुकानांना जाणारा रेशनचा माल हा काळा बाजारात जातो. हा ट्रक रेशनदुकानांवर न जाता थेट गुजरात मधील एका कंपनीतून गव्हाचे पीठ तयार करून ते सीलबंद केले जात असल्याचा आरोप गुप्ता यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, या संदर्भात जळगाव तालुका तहसील कार्यालयातील तहसीलदारांनी १२३ दुकानांना याबाबत नोटिसा दिलेल्या आहेत. दरम्यान, दर महिन्याच्या २३ तारखेला जिल्हा गोडावूनमधून जिल्ह्यात रेशन दुकानदारांना धान्याचे वितरण केले जाते. त्यानंतर संबंधित रेशन दुकानदार हे २४ आणि २५  तारखेला रेशन धान्य वाटप करतात. शासनाच्या नियमानुसार धन्य वाटप करत असताना दिवसभरात दिलेले धान्याचे ऑनलाईन सिस्टममध्ये अपडेट करणे अनिवार्य आहे. तरीदेखील काही दुकानदार हे ऑनलाइन अपडेट करत नाही. तसेच थम सिस्टममध्ये देखील फेरफार करून रेशन धान्याचा काळाबाजार करत आहे. असा आरोप देखील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी कोर्ट चौकातील हॉटेल मेरेको येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे .

भाग १

भाग २

 

Exit mobile version