जिल्ह्यात रूग्ण संख्या ५० हजार पार; आज २८२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज २८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा ५० हजार पार केला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर -७३ जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-३१, अमळनेर-१५, चोपडा-४०, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-७०, रावेर-९, पारोळा-४, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-६, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ० असे एकुण २८२ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,३८०, जळगाव ग्रामीण-२४४५, भुसावळ-३५२४, अमळनेर-४२११, चोपडा-४२०४, पाचोरा-१८७०, भडगाव-१८२२, धरणगाव-२१३८, यावल-१६४०, एरंडोल-२७७१, जामनेर-३७२५, रावेर-२०५७, पारोळा-२४३५, चाळीसगाव-३३१२, मुक्ताईनगर-१४९३, बोदवड-७९४ आणि अन्य जिल्हा ४०१ असे आज एकुण ५० हजार २२२ रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९०.२२ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५० हजार २२२ रूग्ण आढळून आले असून ४५ हजार ३१० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२११ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ३ हजार ७०१ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content