Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात पुन्हा पाच नवीन कोरोना बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अजून ५ रूग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून आज सकाळी प्रशासनाने याची माहिती जाहीर केली आहे.

आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार-जिल्ह्यातील अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, ‘जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 49 व्यक्ती तपासणी अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 44 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील दोन तर अमळनेर, भडगाव, धरणगावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 351 इतकी झाली आहे.

दरम्यान, पुन्हा पाच नवीन रूग्ण आढळून आल्याने आता जिल्ह्यातील रूग्णांच्या संख्येने साडेतीनशेचा आकडा पार केला आहे. अलीकडच्या काळात नवनवीन भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून संचारबंदीत बर्‍यापैकी शिथीलता देण्यात आलेली आहे. याचमुळे अनेक ठिकाणी फिजीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला असून यामुळे रूग्ण संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोनाच्या प्रतिकारासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version