Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४१ वर

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात चार नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून यात अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एक तर पाचोर्‍याच्या दोघांचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरानाग्रस्तांची संख्या ४१ झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने थोड्या वेळापूर्वीच सुधारित प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांबाबत माहिती जाहीर केली आहे.यानुसार, जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version