Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा वेग कायम; १४३७ रूग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे होणार्‍यांचा वेगही सातत्याने वाढत असून रात्री उशीरा जाहीर केलेल्या आकडेवारीत आजवर १४३७ रूग्ण बरे होऊन घरी परतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने रात्री उशीरा जाहीर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १४३७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात रविवारी ९८ रूग्णांना घरी पाठविण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळच्या यादीत १३२ रूग्णसंख्या असल्याचे नमूद करण्यात आले होते. रात्री यात अजून वाढ झाली असून जिल्ह्यात रविवारी रात्रीपर्यंत १६३ रूग्णसंख्या झाल्याचे यात सांगण्यात आले आहे. यासोबत जिल्ह्यातील ९० रूग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये उपचार घेत आहेत. परिणामी जळगाव जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही २४०२ इतकी झाली आहे. वर नमूद केल्यानुसार यातील १४३७ बरे झाले असून १६९ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर ७०६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

Exit mobile version