Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाख 34 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाख 34 हजार 95 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 11 लाख 31 हजार 296 जणांना पहिला डोस तर 4 लाख  2 हजार 799 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 31 हजार 296 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 4 लाख  2 हजार 799 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 15 लाख 34 हजार 95 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 6 लाख 70 हजार 781 तर ग्रामीण भागातील 8 लाख 63 हजार 314 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्‌यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Exit mobile version